Share

Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग

Published On: 

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे देखील सभा घेत आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. अशीच एक सभा आज सासवड भागात सुरु आहे. या सभेत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जबरदस्त डायलॉगबाजी करत त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे मात्र त्यांनी कौतुक केले.

या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा बंडा दरम्यानचे किस्से सांगितले. तर अजित पवारांची नक्कलही करून दाखवली. अजित दादा मनाने खूप चांगले आहेत. पण दादाचा घोटाळा देवाने एकच केलाय ओ. दादाला देवाने नरडं लय करंड दिलंय, असं म्हणताच व्यासपीठावर हास्यकल्लोळ उडाला. तर दुसरीकडे शरद पवारांचे कौतुक करताना ते म्हणाले कि, “अहो शरद पवारांना कॅन्सरचा आजार आहे. जगात कॅन्सर एवढा मोठा आजार नाही. २२ वर्ष ते काम करतायेत. रोज सकाळी साडेपाचला उठत्यात, अंघोळ करत्यात, पांढरा रुमाल तोंडाला लावत्यात आणि कामाला लागत्यात.”

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!