मुंबई – सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी ‘गुड न्युज’ दिली आहे. दिव्यांग शाळेतील ४८९९ शिक्षक व ६१५९ अन्य कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे.दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.
सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित दिव्यांग शाळा-विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे येथील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत आहे. (1/2)#SocialJustice
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 23, 2021
त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने आज (दि. २३) रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील ११ हजार ५८ शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक-कर्मचारी संघटनांनी धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


