नांदेड : माहिती अधिकारात विचारलेली माहिती न दिल्यामुळे नांदेड तालुक्यातील नसरतपुर येथील ग्रामसेवक एस. एफ. कानोडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त दिलीप धारुरकर यांनी ग्रामसेवक एस. एफ. कानोडे याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
१८ ऑक्टोबर २०१७ ते २३ एप्रिल २०१८ या कालावधीत झालेल्या विविधा कामांची माहिती हासापूर येथील रहिवासी गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी माहिती मागीतली होती. सोनटक्के यांनी माहितीचा कायद्यांतर्गंत ही माहिती मागितली होती. या माहितीत सोनटक्के यांनी स्मशानभूमी, घरकूल योजना तसेच प्रत्येक महिन्याला होणाऱ्या बैठकीच्या ठरावाची प्रत मागितली होती. मात्र ग्रामसेवक कानोडे यांनी सोनटक्के यांना कोणाताही प्रतिसाद दिला नाही.
यामुळे सोनटक्के यांनी नांदेड गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गटविकास अधिकाऱ्यांनी सोनटक्के यांना माहिती देण्याचे आदेश पारित केले होते. मात्र त्यानंतरही ग्रामसेवक कानोडे यांनी प्रतिसाद नाही दिला. मग मात्र नाईलाजास्तव सोनटक्के यांनी राज्या माहिती आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर झालेल्या सुनावनीत औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त दिलीप धारुरकर यांनी माहिती कायद्यातंर्गत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक कानोडेला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
महत्वाच्या बातम्या
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- महागाईचा भडका, महिला म्हणतात, गॅसपेक्षा ‘चूल’च बरी
- केंद्राने GDP म्हणून Gas, Diesel आणि Petrol वाढवले ; नाना पटोलेंची केंद्रावर बोचरी टीका
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

