🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर घटून ६ टक्क्यांच्या खाली गेला असल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर घटून ६ टक्क्यांच्या खाली गेला आहे. नुकताच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी) अवघ्या ५.८ टक्के दराने वाढला असल्याचे समोर आले आहे.
मागील आर्थिक वर्षात देशातील बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यावर राहिला आहे. जानेवारी महिन्यात ही आकडेवारी लीक झाली होती आणि त्यावेळी बेरोजगारीचा आकडा हा वर्ष १९७२-७३ नंतर पहिल्यांदाच इतक्या वर उसळला गेल्याचे सांगण्यात आले होते. आणि आता चौथ्या तिमाहीनंतर अत्यंत कमकुवत आकड्यांचा परिणाम संपूर्ण आर्थिक वर्षाच्या जीडीपीच्या वाढीवर पडला. जो ७ टक्क्यांच्या खाली घसरुन ६.८ टक्क्यांवर आला आहे.
आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर ८.१ टक्के राहिला होता. तर संपूर्ण आर्थिक वर्षात देशातील आर्थिक विकास हा ७.२ टक्के दराने झाला होता. म्हणजेच, जानेवारी-मार्च तिमाहीत आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत संपूर्ण आर्थिक वर्षाच्या जीडीपी विकासदराच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये हा आकडा ०.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
विशेष म्हणजे, मोडी सरकारसाठी हा खूप मोठा झटका आहे. कालच पंतप्रधन मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मंत्रीपदाची शपथ घेतली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
