Share

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार 100 देशांना लसीचा पुरवठा, युनिसेफशी केला करार

Published On: 

पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि युनिसेफ यांनी कोरोनावरील लस कोविशील्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना तब्बल 1.1 अब्ज लसींचे डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषधी उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बऱ्याच देशांनी भारताशी संपर्क साधला आहे.

ऑक्सफोर्ड-अस्ट्राझेनेकाची कोरोना व्हॅक्सिन कोव्हिशील्ड पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे आणि नोव्हाव्हॅक्सची निर्मिती यूएस-आधारित नोव्हॅक्स इंक यांनी केली आहे. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी सीरम संस्थेबरोबर कराराची घोषणा केली.

युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोर म्हणाल्या की, आम्ही पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) यासह अनेक संस्थांसह 100 देशांसाठी 1.1 अब्ज लस डोस देण्याची ऑर्डर दिली आहे. ही लस कमी आणि मध्यम आणि निम्न मध्यम उत्पन्न असणाऱ्यांना 3 यूएस डॉलरमध्ये उपलब्ध केली जाईल.

युनिसेफने म्हटले आहे की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीच्या मंजुरीच्या अधीन असलेल्या देशांमध्ये या लसींचे वितरण करण्यासाठी सीरमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वातच कोव्हॅसचा उपक्रम सुरू झाला असून याद्वारे कमी उत्पन्न गटातील लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!