Share

गंभीर! ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर लावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा घाटीत घेराव

Published On: 

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाची अचानक प्रकृती खालवल्याने त्याला रात्री डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात पाठवले. मात्र, या रुग्णाला घाटीतील कर्मचार्‍याने ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर लावले. त्यामुळे त्या रूग्णाचा अपघात विभागात तडफडून मृत्यू झाला. सुनील रमेश मगरे (३८, रा. बापूनगर, खोकडपुरा) असे मृताचे नाव आहे. यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या घाटी रुग्णालयाच्या दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि.३०) घाटीच्या अधिष्ठता डॉ. कानन येळीकर यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने घेराव घालण्यात आला.

सुनील मगरे यांना पोट दुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना बायजीपुरा भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना निमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी घाटीत हलवण्यास सांगितले. घाटीत नेल्यावर त्यांच्यावर अपघात विभागात तपासणी सुरू होती.

त्यानंतर आयपीडीमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेत सुनीलला हलवले. तत्पूर्वी सुनीलला तातडीने ऑक्सिजनची गरज भासली. मात्र, धक्कादायक म्हणजे कर्मचार्‍यांनी चक्क रिकामे सिलेंडर लावून दिले. रिकाम्या सिलेंडरमुळे सुनीलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा नातेवाईकांनीच पळत जाऊन तिसरे सिलेंडर आणले. पण तोपर्यंत सुनीलचा तडफडून मृत्यू झाला होता.

हे प्रकरण मेडिकल बोर्डसमोर ठेवावे, मगरे यांच्या कुटुंबाला ५० लाख नुकसानभरपाई, त्यांच्या पत्नीस शैक्षणिक पात्रतेनुसार रुग्णालयाच्या सेवेत सामावून घ्यावे, त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी आदी मागण्या डॉ.येळीकर यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.भारत सोनवणे, डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. तर निवेदन देतांना नागराज गायकवाड, मनोज वाहुळ, विजय वाहुळ, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!