मुंबई : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण २१ रुग्ण होते. त्यांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबाबत ‘महाराष्ट्र टाईम्स’ने वृत्त दिले आहे.
राज्यात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रत्नागिरीत ९, जळगावात ७. मुंबईत २ आणि पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १ रुग्ण आहे. प्रथम डेल्टा होता. मात्र नंतर डेल्टा प्लस आला. डेल्टाने त्याचे रुप बदलले आहे का, याचा आता बारकाईने अभ्यास सुरू झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. या अभ्यासासाठी राज्यातील ३७ जिल्ह्यातून दर महिन्याला १०० नमुने घेतले जात आहेत.
भारतात डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण
कोरोना दुसरी लाट ओसरत असतांना देशात डेल्टा प्लसमुळे करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतात डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ एसके सिंह यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी देशातील ८ राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. या ठीकाणी ५० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची प्रथमच प्रतिक्रिया, म्हणाले..
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
