🕒 1 min read
मुंबईः प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीओतील वाहन निरीक्षकानेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील सहा बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा या तक्रारीत म्हटलं आहे.
पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- सोलापूर : अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित

