Share

महाराष्ट्रात चाललंय काय ? राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा शहराध्यक्षावर गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

अंबरनाथ- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ,वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.गेल्या काही दिवसात घडलेल्या या घडामोडींमुळे अवघा पुरोगामी महाराष्ट्र हादरला असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यानं शहराध्यक्षांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.या महिला पदाधिकाऱ्यावर एका पोलिसाने बलात्कार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे.

महिला सबलीकरणाच्या गप्पा सर्व पक्षाचे नेते मारत असतात पण महिलांच्या बाबतीत अन्यायकारक घटना घडताना त्यांचा आवाज दाबला कसा जातो हे वारंवार महाराष्ट्रात समोर येवू लागले आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृतानुसार,अंबरनाथ शहरात पदाधिकारी असलेल्या या युवतीने एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एका पोलिसाने लग्नाचं आमिष देऊन आपला बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. त्याशिवाय फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल केला होता.

अशातच या तरुणीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. ज्यावेळी आपण गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात बसलो होतो, त्यावेळी सातत्याने सदाशिव पाटील हे आपल्याला फोन करून गुन्हा दाखल करू नको, असं सांगत होते. तसेच हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही गुन्हा मागे घेतल्यास 20 लाख रुपये घेऊन देतो, असं आमिष पाटील यांनी दाखवल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

दरम्यान, सदाशिव पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मोटे यांच्यावर मी गुन्हा मागे घेण्यासाठी कुठलाही दबाव टाकलेला नाही. त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्या घरचे माझ्याशी उद्धटपणे बोलले. त्यावेळी मी त्यांना फक्त नीट बोलण्यास सांगितले, अशी प्रतिक्रिया सदाशिव पाटील यांनी माध्यमांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!