पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून नामांतराचा मुद्दा गाजत आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर केले जावे अशी मागणी चांगलीच जोर पकडत आहेत. यासोबतच उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करावे अशी देखील मागणी जोर धरताना पाहायला मिळत असताना आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी समोर येवू लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करावे अशी मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेर(जन्म स्थान) अहमदनगर जिल्हयातील चौडी है आहे. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. देशाला अखंडीत ठेवलं. त्यांच्या महान स्मृतीपुढे नतमस्तक होऊन, अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत, ‘अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे तातडीने नामांतर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र –
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासन व आदर्श न्याय पदधतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्यात खऱ्याअर्थानं राम आणला. जेंव्हा हिंदूस्थान परकीय राजवटीमुळे शतखंडीत झाला होता, त्यास अखंडीत ठेवण्याच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिराची निर्मिती केली व शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला व हिंदू संस्कृती ला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.
अशा या महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेर(जन्म स्थान) अहमदनगर जिल्हयातील चौडी है आहे. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. देशाला अखंडीत ठेवलं. त्यांच्या महान स्मृतीपुढे नतमस्तक होऊन, अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत, ‘अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे तातडीने नामांतर करावे…ही नम विनंती करतो. शेवटी आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार? जुलमी परकीय राजवटीचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा? हे महाराष्ट्रातल्या जनतेनं मनात ठरवलं आहे! आता निर्णय तुमचा आहे.– भूषणसिंह राजे होळकर
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड मनपा कर्मचाऱ्यासाठी खुशखबर! सातवा वेतन आयोग होणार लागू
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कराव्यात, मुख्यामंत्र्यांची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
