🕒 1 min read
मध्य प्रदेश : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एका भाजप खासदाराने भ्रष्टाचारासंबंधी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मध्य प्रदेशमधील रिवा मतदारसंघाचे खासदार जनार्दन मिश्रा(Janardan Mishra) यांचा हा व्हिडीओ असून व्हिडिओमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना ते म्हणाले की,’सरपंच होण्यासाठी ७ लाख रुपये लागतात. त्यामुळे जेव्हा लोक सरपंच भ्रष्टाचार करतो अशी तक्रार घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना गमतीने १५ लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगू नका असे सांगतो. त्याने १५ लाखांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केला असेल तर मला सांगा’, असे मिश्रा म्हणाले आहेत.
…When people accuse sarpanch of corruption, I jokingly tell them that if corruption is up to Rs 15 lakhs don't come to me…come only if it's (corruption) beyond Rs 15 lakhs: BJP MP Janaradan Mishra in Rewa, Madhya Pradesh (27.12) pic.twitter.com/ImobGWecBH
— ANI (@ANI) December 28, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’निवडणुकीत ७ लाख रुपये खर्च करून तो सरपंच झाला. याशिवाय अजून ७ लाख रुपये त्याला पुढील निवडणुकीसाठी हवे आहेत. महागाई वाढेल तर आणखी १ लाख त्यात गृहित धरावे लागतील. असे हे १५ लाख रुपये होतात. १५ लाख रुपयांपेक्षा पुढे तो घोटाळा करत असेल तर त्याचा भ्रष्टाचार समजू शकतो.’ तसेच हे समाजाचे नग्न चित्र असून याच क्रमाने वरच्या स्तरावर ही शिडी चढत जाते, असेही मिश्रा यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

