संगमनेर :लोककलावंत कांताबाई सातारकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी संगनमेर इथे अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपूर्वीच त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. कांताबाई सातारकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कांताबाई यांचीसह घरातील इतर सदस्य देखील पॉझिटिव्ह होते. मात्र तब्येत व्यवस्थित असल्याने घरातील काही सदस्यांना घरी सोडण्यात आले होते.
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई आहेत. कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे कमी आढळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब केल्या की पुरुष कलाकारांना त्या भूमिकांची नक्कल करावी वाटत असे.
सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.
रायगडची राणी, गवळ्याची रंभा, गोविंदा गोपाळ, १८५७ चा दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी आदी वगनाट्यात कांताबाईनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. ज्येष्ठ लोककलावंत कांताबाईं सातारकर यांच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गिरीश कुबेर यांनी हे धाडस कोणाच्या जीवावर केले याची माहिती मिळाली पाहिजे : नारायण राणे
- ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत


