औरंगाबाद:अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यावर्षीचा ‘प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कार’ संत वाड्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण(Y.M. Pathan) यांना मिळाला. मराठवाड्यासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळावे आणि त्यांच्या हातून असेच लेखण होत राहो असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी काढले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी डॉ. पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी डॉ. यू.म. पठाण यांच्या तब्येतीची देखील चौकशी केली. यावेळी त्यांचा मुलगा, सुन, मुलगी आणि नातवंडेदेखील उपस्थित होते. मराठी संत परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक म्हणून डॉ. यू. म. पठाण सर्वदूर ओळखले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री नागरी पुरस्कार देखील मिळाला आहे. संत साहित्यावर त्यांचे जवळपास २० ग्रंथ प्रकाशित असून एकूण ग्रंथसंपदा ४० च्या आसपास आहे.
राम शेवाळकर पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही त्यांचा गौरव केला आहे याचा नक्कीच आपल्याला सार्थ अभिमान आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी डॉ. यू. म. पठाण यांनी देखील त्यांच्या जीवनातील अनेक घटना जिल्हाधिकारी यांना सांगूण जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते कशा प्रकारे साहित्य लेखणाकडे वळले, कशा प्रकारे साहित्याची गोडी लागली आणि पुर्णवेळ कसे या क्षेत्रासाठी वाहून घेतलं या सर्व गोष्टींचा पट त्यांनी यावेळी उलगडला. डॉ यु म पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना ‘द्रष्टे शिक्षणतज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक देखील भेट दिले.
महत्त्वाच्या बातम्या
“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

