🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या पोस्ट मुळे नेहमीच चर्चेत असतात. आता देखील अमिताभ बच्चन त्यांच्या एका कवितेमुळे चर्चेत आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केलेली एक कविता चोरीची असल्याची चर्चा होत आहे.
T 3761 – थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध ख़ुशियों का
*थोड़ी पत्तियां ख़यालों की..*थोड़े गम को कूटकर बारीक,
हँसी की चीनी मिला दीजिये..
*उबलने दीजिये ख़्वाबों को*
*कुछ देर तक..!*यह ज़िंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
*घूंट घूंट कर मज़ा लीजिये…!!*☕???? pic.twitter.com/qwGbczzcLp— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 23, 2020
एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना त्याचे क्रेडिट दिले नाही, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
टीशा अग्रवाल असे या महिलेचे नाव आहे. टीशा अग्रवाल कवियित्री आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलेली कविता टीशा यांनी २४ एप्रिल २०२० मध्ये लिहून फेसबुकवर पोस्ट केली होती. हीच कविता अमिताभ बच्चन यांनी २४ डिसेंबरला आपल्या ट्विटरच्या अकांऊटवरून शेअर केली आहे. हे लक्षात येताच टीशा अग्रवाल यांनी जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाहीत. अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख अशा आशयाची पोस्ट केली आहे. टीशाच्या या पोस्टवर अमिताभ बच्चन अजूनही काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- ‘सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करू’
- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
