Share

‘विद्यार्थ्यांचा आक्रोश वडिलांना पाठवा, ते तुमच्याशिवाय कुणाचंच ऐकत नाही’, चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा पार पडली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या परीक्षेत राज्यातील अनेक शहरांत मोठा गोंधळ उडाला. भंडारा तसेच पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऐन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळामुळे सध्या राज्य सरकार तसेच परीक्षेचे आयोजन करणारी ‘न्यासा कम्युनिकेशन’ या खासगी कंपनीवर सडकून टीका केली जात आहे.

आरोग्य विभागाने घेतलेल्या परीक्षेत सावळागोंधळ दिसून येत असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहित राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पत्रात आदित्य ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवा. कारण ते तुमच्याशिवाय कुणाचंही ऐकत नाही. त्यामुळे वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ यांनी लिहिलेलं पत्र जसेच्या तसे
मा. आदित्य ठाकरेजी,
खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती. परंतु तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्या शिवाय कोणाची चिंता नाही. तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाहीत म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे. वास्तविक मुलाच्या भवितव्यासाठी वडील किती कष्ट घेतात हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तुमचे वडील स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत. तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून मी सातत्याने आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ त्यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेचे असंख्य विद्यार्थ्यांचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. असो. आज पाचव्यांदा आरोग्य विभागाचा पेपर फुटला आहे. यावर माझे काही प्रश्न आहेत.

न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही?
एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकलं नाही?
एजन्सीला परीक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?
MPSC सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्याया एजन्सीच का निवडली?

या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावी. खरंतर ४ वेळा ठेच लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते? यात तिन्ही पक्षात काही साटंलोटं झालंय का असा याचा संशय येतो. आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवाल आणि वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असे चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!