Share

‘नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच शरद पवारांना पुरावे देणार’, फडणवीसांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. पण त्यासोबतच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीसांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यासंदर्भात कालच रिव्हरमार्चच्या टीमनं त्यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. तो व्यक्ती त्या संघटनेने हायर केलेला होता. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते. त्यावेळी मी आणि अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीसोबत फोटो काढला होता. मात्र, जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला.

नवाब मलिक यांनी सुरुवात केलीय तर मला आता हे प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल. नवाब मलिक एनसीबीवर दबाव आणण्यासाठी हे काम करत आहेत. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत हास्यास्पद आहेत. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीनं ड्रग्जसह अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नवाब मलिकांकडून केला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!