Share

‘चोराच्या उलट्या बोंबा; विनाशकाले विपरीत बुद्धी’, अमृता फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गेले काही दिवस एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करत त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. आर्यन खानच्या सुटकेनंतर हे प्रकरण काहीसं शमलं. मात्र आता नवाब मलिकांनी या प्रकरणाबाबत भाष्य करणं सोडलं नाही. नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

मलिक यांनी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है’, अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. अन्य एका ट्विटमध्ये या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यालाच आता अमृता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’ असा प्रश्न उपस्थित करत मलिकांवर निशाणा साधला आहे.

‘अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेबाबत एक गीत म्हटलं होतं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अभिनय केला होता. त्याचा गाण्याचा फायनान्स हेड हा जयदीप राणा होता. तो ड्रग्स पेडलर असून त्याचे फडणवीसांसोबत घनिष्ठ संबंध आहेत’ असे गंभीर आरोप मलिकांनी केले आहेत. त्यालाच अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!’ असं म्हणत त्यांनी मलिकांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!