Share

‘राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप केला आहे. याची सीबीआय आणि इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असाही आरोप त्यांनी केला. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचे खेळ चालू झाला आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस याच्यासोबतजयदीप राणाचा फोटो शेअर केला आहे. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. इतकच काय तर अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. तर सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है’, अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!’ असं म्हणत त्यांनी मलिकांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!