Share

पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नामांकन पाठवा; मोदींचे देशवासियांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- तळागाळात अपवादात्मक परिस्थितीत काम करणारे परंतु अद्याप प्रकाशझोतात न आलेल्या लोकांचे नामांकन जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सप्टेंबर पर्यंत ही नामांकने करता येऊ शकतील.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात अतिशय वेगळ्या पठडीतील काम करीत आहेत. अनेकदा, आपण त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नसते अथवा पाहिलेले नसते. आपल्याला अशा प्रेरणादायी व्यक्ती माहीत आहेत का ? आपण त्यांची नावे पद्म पुरस्कारासाठी नामांकित करू शकता. नामनिर्देशने 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील.

पद्म पुरस्कर काय आहे?

पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. नामांकन लोक करतात. पात्र व्यक्ती स्वतःचं नावही नामांकीत करू शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!