मुंबई : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हा त्याच्या फलंदाजीसाठी जगविख्यात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय आहे. मात्र पहिला त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी खुद्द विरेंद्र सेहवागनेच केली होती. आणि तीही ३ वर्षे आधिच काय आहे किस्सा पहा.
भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणने आपल्या २८१ अँड बियॉन्ड या आत्मचरित्रात याबद्दलची आठवण मांडली आहे. २००१ मधील ऐतीहासीक कसोटी सामन्यात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने तब्बल ४५२ चेंडु खेळत २८१ धावांची खेळी साकारली होती. त्या सामन्यात लक्ष्मणचे त्रिशतक थोडक्यात हुकले होते. त्या सामन्या राहुल द्रविड बरोबर 376 धावांची भागिदारी रचत भारताने तो सामना फॉलोऑन मिळाल्यानंतरही जिंकला होता. या सामन्यात लक्ष्मणला ग्लेन मॅकग्राथने बाद केले होते.
या सामन्यानंतर काही दिवसांनी पुण्यात सेहवागने लक्ष्मणला म्हटले की, लक्ष्मण भाई, तू कोलकता कसोटीत त्रिशतक करण्याची चांगली संधी गमावली. आता मी कसोटी क्रिकिटमध्ये त्रिशतक करणारा भारताचा पहिला फलंदाज बनेल. तू बघच.” त्यावेळी लक्ष्मणने सेहवागकडे आश्चर्याने पाहिले. कारण त्यावेळी सेहवाग फक्त चार एकदिवसीय सामने खेळला होता. कसोटीत तर तो संघातही नव्हता तरीही तो अशी भविष्यवाणी करत होता. या घटनेनंतर सेहवागने तीन वर्षांनंतर पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे २९ मार्च २००४ रोजी त्रिशतक करत ती भविष्यावाणी खरी केली आणि सेहवागने लक्ष्मणला भविष्यवाणी खरी झाल्याची आठवणही करुन दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

