मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापुर्वीच काही संघाना काही धक्के बसले आहेत. राजस्थानच्या संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाही. तर दिल्ली कॅपीटलचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्याला मुकणार आहे.
मात्र यादरम्यान श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. मंगळवारी आखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. दिल्ली कॅपीटलने त्याच्या नव्या कर्णधारपदी भारताचा धडाकेबाज युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी स्पर्धेत अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि स्टीव्हन स्मिथ हे होते. आयपीएल २०२१ च्या सत्रात रिषभ पंत हा सर्वात युवा कर्णधार बनला आहे.
रिषभ पंत हा मुळचा दिल्लीचा असल्यामुळे संघाला त्याचा फायदा होईल. तसेच मागील काही महिन्यातील त्याची कामगीरी उत्तम असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्याचा फायदा संघाला नक्कीच होईल अस दिल्ली संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिल्लीच्या संघाचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही. मागील आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
- महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

