Share

ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं

Published On: 

मुंबई : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेत ना भुतो ना भविष्य अशी घटना घडली आहे. क्रिकेटच्या इतिहासात कधीही अगदी गल्ली क्रिकेटच्या इतिहासात न घडलेली घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडली आहे. या सामन्यात दुसरा डाव सुरु झाला तरी सामना खेळणाऱ्या बांगलादेश आणि न्युझीलंड दोन्ही संघाना किती धावा करायच्या किंवा किती धावांचा बचाव करायचा याचीच माहिती नव्हती.

मंगळवारी नेपीयर येथे झालेल्या न्युझीलंड आणि बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात न्युझीलंडच्या संघाची पहिली फलंदाजी होती. न्युझीलंडच्या संघाने १७.५ षटकात ५ बाद १७३ धावांची मजल मारली आसता मैदानात पावसाचे आगमन झाले. यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पाऊस संपल्यानंतर मात्र न्युझीलंडच्या संघाला फलदांजीची संधी न देता डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना खेळविण्यात आला. त्यामुळे बांगलादेशचा संघ फलदांजीला उतरला.

मात्र यादरम्यान बांगलादेशच्या फलंदाजाना धावांचे लक्ष्यच माहित नव्हते. एवढेच नाही तर न्युझीलंडच्या संघालाही किती धावांचा बचाव करायचा हे माहित नव्हते. या गोंधळाचे मुख्य कारण होते सामनाधिकारी मार्टिन क्रो. कारण ते पुरते गोंधळुन गेले होते. डकवर्थ-लुईस नियमाच्या समीकरणानुसार किती धावांचे लक्ष्य द्यायचे हा गोंधळ उडाला होता. या दरम्यान बांगलादेशचे प्रशिक्षक मार्टिन यांना भेटल्यानंतर त्यांनी बांगलादेशला विजयासाठी १६ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशच्या संघाला १४२ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार न्युझीलंडने हा सामना २८ धावांनी जिंकला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!