Share

धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं

Published On: 

बीड : संपूर्ण जिल्ह्याला हलवून सोडणाऱ्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तालुक्यातील जानेगाव येथे एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना २५ रोजी रात्री घडली होती. अखेर पतीच मारेकरी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखा व युसूफवडगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपासानंतर मारेकरी पतीला अटक करण्यात आली आहे.

आजीच्या नावे असलेली पावणेचार एकर जमीन नावची करुन घेत नाही म्हणून पत्नीला संपविल्याची कबुली त्याने दिली. जानेगाव येथे २५ मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घरापासून काही मीटर अंतरावर आशाबाई उर्फ अश्विनी अनुरथ चटप या महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या डोक्यावर घाव होता. यावरुन धारदार शस्त्राने हल्ला करुन तिला संपविल्याचा अंदाज होता. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यात डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

तिचे वडील बन्सी जाधव यांच्या फिर्यादीवरुन युसूफवडगाव ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. घटनास्थळी तपासणी करुन तपास सुरु केला होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी उस्मानाबाद येथील श्वानपथकाने मयत आशाबाईच्या घराजवळच माग काढला होता तसेच एक श्वान पती अनुरथ चटप याच्या जवळ घुटमळत होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!