Share

सेहवागने केली पंजाबच्या शाहरुखची किरॉन पोलार्डसोबत तुलना, म्हणाला…

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

या स्पर्धेत पंजाबकडून एका खेळाडुने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो खेळाडु म्हणजे शाहरुख खान. बॉलीवूडच्या शाहरुख खानच्या लोकप्रीयतेमुळे पंजाबच्या शाहरुख खानचीही आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगलीच चर्चा रंगली होती.

तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शाहरुख खानचे अनिल कुंबळे पासून वीरेंद्र सेहवागपर्यंत अनेक जण फॅन्स आहेत. सेहवागनं शाहरुखची तुलना वेस्टइंडिजचा आक्रमक बॅट्समन किरॉन पोलार्डशी केली आहे. शाहरुख खानला वरच्या क्रमांकावर बॅटींगला पाठवलं तर तो शतक लगावेल असा विश्वासही यावेळी सेहवागनं व्यक्त केला आहे.

‘क्रिकबझ’शी बोलताना सेहवागनं सांगितले ती ‘त्याचा खेळ पाहून मला तरुणपणीचा पोलार्ड आठवतो. त्याच्याकडं पोलार्डप्रमाणे जागेवर उभं राहून सिक्स मारण्याची क्षमता आहे. शाहरुखकडं योग्यता आहे. त्यानं छोट्या खेळी केल्या आहेत. मात्र तो जितका खाली बॅटींगला येईल त्याला तितकेच कमी बॉल खेळायला मिळतील.’ असं सेहवागनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!