Share

औरंगाबाद प्राणिसंग्रहालयाची दुरावस्था पाहून केंद्रीय पथकाचा संताप अनावर, मनपाला सुनावले खडे बोल!

Published On: 

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या पथकाने येथील सोईसुविधांची कमतरता पाहून नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी (दि.१६) आणि शनिवारी (दि.१७) सलग दोन दिवस याठिकाणी बारीक तपासणी केली. त्यावेळी प्राण्यांची काळजी घेतली जात नाही, पर्यटकांसाठी सुविधा नाही, आवश्यक कर्मचार्‍यांची भरती नाही, या प्रमुख बाबींवर बोट ठेवत प्राणिसंग्रहालयाला कशी मान्यता द्यावी, असा प्रश्न पथकाने उपस्थित केला. नाराजीतच पथक परतले. मात्र पालिका अधिकार्‍यांनी नेहमीप्रमाणे त्रुटींची पूर्तता करण्याचे आश्‍वासन पथकाला दिले आहे.

अडीच वर्षांपूर्वी औरंगाबाद पालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील अपुरी जागा, प्राण्यांचे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले पिंजरे, देखभाल दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २८ त्रुटी काढून त्यांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. ३ वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी मान्यता कायम ठेवण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला. त्यामुळे प्राधिकरणाने एक वर्षासाठी मान्यता दिली.

गेल्या १६ महिन्यांपासून कोरोना संसर्ग असल्याने प्राणिसंग्रहालयाच्या पाहणीसाठी पथक आले नव्हते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणचे डॉ. गोवारी मालापूर, टी. अजयकुमार या दोघांच्या पथकाने शुक्रवार व शनिवारी दोन दिवस प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. दुसर्‍या दिवशीही शनिवारी सकाळपासूनच पथकाने प्राणिसंग्रहालयाच्या तपासणीसाठी ठाण मांडले. अत्यंत बारकाईने प्राण्यांच्या प्रत्येक बाबींची तपासणी केली. प्रत्येक त्रुटींवर बोट ठेवत पथकाने नाराजी व्यक्‍त केली.

प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही. त्यांच्यासाठी मचान बांधण्यात आलेले नाही, खेळणी ठेवलेली नाही, पिंजरे मोठे नाहीत, फिरण्यासाठी जागा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, वेगवेगळया प्रकारच्या प्राण्यांसाठी वेगवेगळे केअर टेकर नेमण्यात आलेले नाही. अपुर्‍या जागेतच प्राण्यांना ठेवलेले आहे. रोज येणार्‍या पर्यटकांसाठी कुठल्याच सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, बसण्याची सुविधा नाही, फिरण्यासाठी मोकळे रस्ते नाहीत, प्राण्यांना पाहण्यासाठी मचान बांधण्यात आलेले नाही, पर्यटकांच्या विश्रांतीची व्यवस्था नाही, अशा विविध त्रुटींवर पथकाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!