Share

तेली समाजातील मागास जातींचा अतीमागास प्रवर्गामध्ये समावेश करा- जयदत्त क्षीरसागर

Published On: 

औरंगाबाद : अखिल भारतीय तैलीक साहू महासभेच्या वतीने तेली समाजातील काही मागास जातींचा समावेश अतीमागास प्रवर्गामध्ये करण्याची मागणी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. महासभेच्या मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. या निमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उत्तरप्रदेश मधील काही मोजक्या जातींनाच ओबीसी आरक्षणाचा लाभ होतो. आपल्याकडे राज्यातही अशा अनेक जाती आहेत. त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने न्या. रोहिणी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगामध्ये सर्वांना समान आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी तीन टप्प्यात आरक्षणाची विभागणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात राज्यातील काही मागास जातींचा समावेश अतीमागास प्रवर्गात करण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नको : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमीका आधीच स्पष्ट केली आहे. मात्र, त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर आणि इतर मागास समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे मत जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी समन्वयातून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. त्यासाठी आपण मध्यस्थ म्हणून काम करणार असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!