मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री करिना कपूरने अर्थात बेबो कोणत्या न कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिली आहे. सध्या ती सोशल मिडीयावर सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ करीना सोशल मिडीयावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने एक बालपणीचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये करीना,आई बबिता आणि बहीण करिश्मासोबत दिसून येत आहे. करीनाने हा फोटो शेअर करत ‘काय ख्रिसमस आधीपासूनचं आहे’, असे अनोख कॅप्शनही दिलं आहे. या तिघींचा हा फोटो जवळजवळ 80 च्या दशकातील आहे.
https://www.instagram.com/p/CRbIhHwJ32n/?utm_source=ig_web_copy_link
करीनाच्या या फोटोवर तिची ननंद सबा पतौडीने ‘माशाअल्लाह’ असं म्हटल आहे. तर करिश्मानेसुद्धा हार्ट इमोजी शेयर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
करीनाने २००० साली ‘रिफ्युजी’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. अभिनेता अभिषेक बच्चन सोबत तिने काम केल होत. करीना ‘वीरे दी वेडींग’ आणि हंसल मेहतांच्या चित्रपटासाठी काम करत आहे. याशिवाय करीना करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही दिसणार आहे. आमिर खान सोबत लवकरच ती ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटातही झळकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा फंलदाजीचा निर्णय
- ‘या लबाड कोल्ह्याने औकात पाहून वक्तव्य करावं’, आढळराव पाटलांचा हल्लाबोल
- पोस्टाने आणली ‘ही’ भन्नाट योजना ; एकाच प्रीमियममध्ये नवरा-बायको दोघांचाही विमा, सोबतच मिळणार…
- देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी
- ‘धाकड’चे शूटिंग पूर्ण होताच अर्जुनने शेअर केली भावूक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

