Share

‘मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे’ ; आशिष शेलार यांचा आरोप

Published On: 

मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली. दरडीचा भार संरक्षक भिंतीवर आल्याने ही भिंतच घरांवर कोसळली.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. ‘मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली..

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ आज घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेत दगावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांसाठी सर्वांनीच मदत केली पाहिजे. महापालिकेने या नागरिकांचं पुनर्वसन करावं. त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. धोकादायक भिंत काढावी. राज्य सरकारनेही मदत करायला हवी. या दुर्घटनेबद्दल आपण संवेदना प्रकट केल्या आहेत. ते ठिक आहे. पण या लोकांना सावरण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. जे सत्तेत आहेत त्यांनी काही निर्णय घेतला की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरू ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!