🕒 1 min read
मुंबई : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन सुरु झाला आहे. मात्र यंदा या शोमधील कोणत्याही स्पर्धकाची चर्चा न होता सुत्रसंचालक महेश मांजरेक यांच्या लुकची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/tv/CUP4GX8IXXm/?utm_source=ig_web_copy_link
नुकताच बिग बॉस चावडीमध्ये महेश मांजरेकर यांचा लुक पाहून नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.एका व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावल्याचे दिसत आहे. त्यावेळी महेश मांजरेकरचा लुक पाहून त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले आहे.
दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘मला वाटलं भुजबळच आहे की काय’, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय,’ ‘Same to same छगन भुजबळ साहेब,’ ‘आम्ही तर भुजबळ साहेबांना बघायला आलो,’ अशा कमेंट सोशल मिडीयावर पाहायला मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
