🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- संपूर्ण भारताला वेड लावणाऱ्या नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नेटफ्लिक्स इंडियाने त्यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. सोमवारी नेटफ्लिक्स इंडियाच्या ट्विटर पेजवरुन दुसऱ्या सीजनचा टीझर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैफ अली खान, नवाजुद्दीन सद्दिकी आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत या दुसऱ्या भागात दोन नवे चेहरे दिसणार आहेत. कल्की कोचीन, रणवीर शौरी असे दोन कलाकार दिसणार आहेत.
यूट्युबवर टीझर शेअर केल्यापासूनच तुफान व्हायरल होत आहे. तरुणाईमध्ये ‘सेक्रेड गेम्स’ची तुफान क्रेझ आहे. पहिला सीझन संपल्यानंतरच अनेकांनी दुसरा सीझन लवकरात लवकर यावा अशी मागणी केली होती. आता दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज केल्यामुळे या सीझनची उत्सुकता दुप्पटीने वाढली आहे.
हा दुसरा भाग कधी येणार याबाबत अद्याप निर्माते तसेच नेटफ्लिक्स कडून काहीही सांगण्यात आले नसले तरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या वेबसिरीजचा दुसरा भाग रिलीज होणार असल्याचे समजते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

