मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. करीनाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. मात्र, या सगळ्यात करीनाचा जवळचा मित्र आणि अभिनेता अर्जुन कपूरने तिला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्याने करीनाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनंतर उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सैफ अली खान, करीना, अर्जुन आणि तैमूर दिसत आहेत. हा फोटो भूत पोलिसच्या चित्रीकरणा दरम्यानचा आहे. या फोटोत अर्जुन तैमूरसोबत खेळताना दिसत आहे. तर करीना बसल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत, ‘उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. टिम, नवाब साहब आणि मी आमचा हा फोटो पोस्ट करण्यासाठी मला फक्त एक निमित्त हवे होते आम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक वेळी तू सगळ्याचं लक्ष केंद्रीत करून घेशील,’ अशा आशयाचे कॅप्शन अर्जुनने त्या फोटोला दिले आहे.
करीना आणि अर्जुनने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘की अँड का’ या चित्रपटामध्ये काम केले होते. तर ‘भूत पोलिस’ या चित्रपटातून पहिल्यांदाच अर्जुन आणि सैफची जोडी मोठ्या पडद्यावर दिसली आहे. तर करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे. उशिरा का होईना दिलेल्या शुभेच्छा करीनासाठी यादगार राहिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
