🕒 1 min read
चेन्नई : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कुटुंबीयांना वेळ देत आहे. क्रिकेटपासून दूर असल्यानं धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूरले आहेत. त्यामुळेच त्यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाची प्रतीक्षा आहे.
पण, या चाहत्यांना धोनीची झलक पाहण्याची संधी मिळाली आहे आणि निमित्त ठरलं ते धोनीच्या मित्राच्या लग्नाचे.. धोनीची पत्नी साक्षी हिनं सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याच लग्नसमारंभात धोनीचा रोमँटिक अंदाजही अनेकांना पाहायला मिळाला. धोनी आणि साक्षीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. या व्हिडीओ वरती चाहते भरभरून कंमेंटस देखील करत आहेत. धोनीचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी धोनी आणि साक्षीच्या जोडीला खूप पसंती दिली आहे.
Blessing your feed with morning dose of Happiness ????#MSDhoni #Dhoni pic.twitter.com/JwZPUROZ8s
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) February 16, 2021
https://twitter.com/TrendsDhoni/status/1361517625042374659?s=20
महत्वाच्या बातम्या
- ॲक्शन सीन दरम्यान जॉनला दुखापत, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती
- ‘काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात’
- ‘भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे ?’
- “खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी…”,अक्षर पटेलचं चोख प्रतिउत्तर
- परभणीत पेट्रोलच्या दराने गाठली शंभरी, पॉवर पेट्रोल १०० रुपये ३७ पैसे प्रतिलिटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
