Share

‘तुझ्या दंडात किती ताकद आहे ते पहिले बघ’ ; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या दोन-तीन दिवसापासून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्ली मुक्कामी आहेत आणि गुप्त भेटी घेत आहेत. काल या भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय झाला आहे.

भाजपच्या या बैठकीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोर्चेबांधणी हे शब्द बोलायला सोपे आहेत. आमची मोर्चेबांधणी आणि आमची तटबंदी काय आहे याची कल्पना त्यांना आहे, जनता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यावेळी जनता कुणाला आशीर्वाद देणार ते दिसेलच’, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला होता.

दरम्यान आता यावर भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देताना राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सध्या भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!