Share

‘अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर…’ ; किरीट सोमय्यांचे खुले आव्हान

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आज पत्रकार परिषेद देखील घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही यावेळी केली.

तसेच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सोमय्यांनी हल्ला चढवला आहे. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? 65 कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि 700 कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

तर छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्याबाबत विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक वक्तव्य सोमय्यांनी केले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात आहे. असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!