Share

दाऊद गँगचा फायनान्सर युसुफ लकडावालाचा अर्थर रोड कारागृहात मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दाऊद गँगचा फायनान्सर युसुफ लकडावाला याचा अर्थर रोड कारागृहामध्ये मृत्यू झाला आहे. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. लकडावलाला पोलिसांनी जे जे रुग्णालयात नेलं दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने ग्रस्त होता. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर तर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता. एन. एम. जोशी मार्गाचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी लकडावालाच्या मृत्यूची अपमृत्यूची करत असल्याची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना २०१० मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायलयाने याप्रकरणी लकडावाला यांची निर्दोष सुटका केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदी प्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (७६) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.

युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला. मग मे २०२१ मध्ये युसूफ लकडावाला यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आली. हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील ५० कोटींची जमीन अगदीच कमी किमतीत लाटल्याचा आरोप होता. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडीकडून अद्यापही चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!