Share

‘सीट कमी सेटिंग जास्त’; आरोग्य विभागाने ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने ‘अभाविप’चे तीव्र निदर्शने

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार व दिरंगाई मूळे राज्य सरकार विरोधात शास्त्री रॉड , पुणे येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने केले.

दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु परीक्षा केंद्रावर अनेक गैरव्यवहार झाल्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द केलेली असताना देखील काही आरोग्य सेवकांना नियुक्ती देण्यात आली. यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

पुन्हा परीक्षेचे नवीन वेळापत्रक आरोग्य विभागाने जाहीर केले, त्यानुसार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार होती. परंतु आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा नवीन वेळापत्रक घोषित करून दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार असल्याचे सांगितले. दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) पूर्वनियोजित असल्यामुळे एकाच वेळेस दोन परीक्षा होणार असे चित्र उभे राहिले.

दिनांक २५ सप्टेंबर २०२१ ला पद ‘क’ साठी परीक्षा होणार होती परंतु यात एकाच विद्यार्थ्यांचा एकाच वेळी दोन केंद्रावर वेगवेगळ्या पदांकरिता परीक्षा असल्याचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना मिळाले त्यामुळे विद्यार्थी कोणती परीक्षा द्यावी ? अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दिनांक २६ सप्टेंबर २०२१ ला आरोग्य विभाग पद ‘ड’ करता होणारी परीक्षा सकाळी १० ते १२ या वेळात ‘नाशिक’ मध्ये होत असेल तर त्याचवेळी विद्यार्थ्याची परीक्षा दुपारी ०२ ते ०४ वेळात जालना या ठिकाणी होणार असल्याचे केंद्र देण्यात आले. परीक्षार्थी विद्यार्थी नाशिक ते जालना दोन तासाच्या आत कसा जाईल ? याची हा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले व यामुळे देखील गोंधळ झाला.

अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ‘उत्तर प्रदेश’ व काही विद्यार्थ्यांना तर परीक्षा केंद्र कोड हा ‘चीन’ असल्याचे हॉल तिकीट मिळाले. यामुळे आरोग्य विभागातील परीक्षेतील सावळागोंधळ समोर येतो. कुठल्याही प्रकारची पारदर्शकता या परीक्षेमध्ये दिसून येत नाही अनेक ठिकाणी या परीक्षेमध्ये आर्थिक सट्टेबाजी होत असल्याचे आरोप देखील करण्यात आलेले आहेत.

या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने नामुष्कीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळात हा सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे हा दूर करू न शकल्यामुळे शासनाने नामुष्की ने हा मार्ग स्वीकारला आहे. आरोग्य विभागाची परीक्षा आयोजन करण्यातचे काम ‘न्यासा’ एजन्सीला देण्यात आलेली आहे या एजन्सीच्या कारभारावर खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्हे निर्माण होतात.

या संपूर्ण प्रकारातुन असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अत्यंत बेफिकीर आहे, राज्य सरकारने तात्काळ परीक्षा घ्याव्यात अन्यथा ‘अभाविप’ पुणे शहराच्या चौका चौकात राज्य सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, तसेच निष्क्रिय आरोग्य मंत्री यांचा राजीनामा मिळावा अशी मागणी या वेळी भाग संयोजक क्षुदांत पाटील यांनी केली आहे. या वेळी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर, दयानंद शिंदे, शुभनकर बाचल, सोहम नारकर, तन्मय ओझा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!