Share

मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान

Published On: 

मुंबई : दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह माथाडी नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. यावेळी मेळाव्यात भाषण करताना फडणवीस यांनी जोरदार भाषण करत राज्य सरकारला देखील लक्ष्य केलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे नमूद करताना नरेंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत देखील खुलासा केला. ‘आज कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आपण घेतला. नरेंद्र पाटील म्हणाले होते की की केंद्रीय श्रममंत्री या कार्यक्रमात यायला हवेत. मी त्यांना म्हटलं की आपल्या कार्यक्रमात संख्या इतकी असते, की कोविडचे नियम मोडल्याबद्दल आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल. पण नरेंद्रजींनी याच वर्षी केंद्रीय श्रममंत्र्यांना बोलवायला सांगितलं. ते म्हणाले, काही काळजी करू नका. नियमानुसार दोन्ही डोस घेतलेले लोक सभागृहात उपस्थित राहतील आणि इतर सगळे जण ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम पाहतील. मी भूपेंद्र यादव यांचे आभार मानतो की त्यांनी फक्त एका फोनवर कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला,’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

‘आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, तेव्हा…’; फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

‘माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत,’ असं भाष्य फडणवीस यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!