जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जळगाव येथे ओबीसी परिषदेत तुरुंगातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी खंत व्यक्त करत त्यावेळच्या आपल्या अवस्थेबाबत भाषणात उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, ‘मला तुरुंगात टाकलं. प्रकृती खूप गंभीर झालेली. वाटलं सगळं संपलं, पण मी त्या मरणाच्या दारातून परतलो,’ असं म्हणतानाच ते भावुक देखील झाले.
भुजबळ यांनी आजच्या ओबीसी परिषदेत तुफान भाषण केलं. अनेकांना टोला लगावले तर उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली. यावेळी त्यांनी आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख देखील केला. ‘कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. मला जेलमध्ये टाकलेलं. एकदा प्रकृती खूप गंभीर झालेली. तिथं एक गोष्टी सोपी असते. कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं. आजारी पडला की त्याच्याकडं बघायचंही नाही. एक दिवस हार्ट अटॅकनं गेला म्हणून सांगायचा. विषय तिथंच संपला,’ असं धक्कादायक विधान भुजबळ यांनी केलं.
पुढे ते म्हणाले, ‘माझी प्रकृती बिघडलेली. हे कपिल पाटलांना कळलं. त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला. ते म्हणाले, तुम्ही काय वागणूक देताय भुजबळांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाही. नीट काळजी नाही. तिथं मारून टाकणार काय तुम्ही? त्यानंतर शरद पवारांनी पत्र पाठवलं. भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. अन् सुदैवानं मी बाहेर आलो.’ यावेळी उपस्थितांमध्ये देखील खुसपूस सुरु झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- नगरचा डंका देशभरात गाजला; यूपीएससी परीक्षेत चार मुलं यशस्वी
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
