Share

ग्रामीण भागातील शाळा सुरु, सोमवारपासून शिकवणीला सुरुवात होण्याची शक्यता

Published On: 

औरंगाबाद : नव्या शैक्षणिक वर्षाला मंगळवार, १५ पासून सुरुवात झाली. मात्र ग्रामीण भागात अध्यापनाविषयी शासनआदेश आला नसल्याने फक्त शाळा उघडून स्वच्छता करण्यात आली. अंदाजे सोमवारपासून अध्यापनाला सुरुवात होईल असा अंदाज जिल्हा परिषद शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

दरवर्षीप्रमाणे नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ उत्साहात होत असतो. मुलांचा किलबिलाट, शिक्षकांची घाई गडबड, पुस्तकांचे वाटप, विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत, अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा होतो. मात्र यंदा मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष शाळांना परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे यंदाही शाळांत त्या प्रमाणात उत्साह दिसून आला नाही.

शासनाच्या आदेशानुसार, मंगळवार १५ पासून शाळांना सुरु करण्याचे आदेश होते. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियोजन होते. त्यानुसार, शहरी भागात १०० टक्के तर ग्रामीण भागात ५० टक्के शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार, शहरी व ग्रामीण भागात शिक्षकांनी उपस्थिती लावली. शहरात ऑनलाईन वर्गही सुरु झाले मात्र ग्रामीण भागात शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरु झाले नसल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी सांगितले. मात्र शासनाने सांगितल्यानुसार, ग्रामीण भागातील सर्व शाळेत ५० टक्के शिक्षक उपस्थित होते. मंगळवारी ग्रामीण भागातील शाळांनी शाळेची स्वच्छता, साफसफाई, निर्जंतुकीकरण, सुशोभीकरण केले असल्याचे ते पुढे म्हणाले.

लवकरच अध्यापनाबाबत शासननिर्णय प्राप्त होईल. त्यानुसार अध्यापन सुरु होईल. अध्यापन ऑनलाईन करायचे कि ऑफलाईन हे तेव्हाच समजेल. अंदाजे सोमवार २१ जूनपासून अध्यापनाला सुरुवात होईल अशी आशा जैस्वाल यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!