मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
मात्र मुंबईतील शाळा सुरु होणार कि नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आता 4 ऑक्टोबरपासून राज्य सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतील शाळा सुरु होणार आहेत. मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मंजुरी दिली आहे.
परंतु आता नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. तसंच विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना जूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. असे देखील पेडणेकर यावेळी म्हणाल्या आहेत.
तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी जाहीर केले आहे. तसेच महापालिका अधिपत्याखाली असलेल्या आठवी ते बाराकीच्या शाळा नजीकच्या पालिका आरोग्य केंद्र किंवा खासगी आरोग्य केंद्राशी जोडण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना तीन खास मास्कचे वाटप केले जाणार आहे. यातील एकेक मास्क हा सलग 35 दिवस वापरता येणार आहे. तसेच शाळांचे सोडीयम हायपोक्लोराईड सोल्यूशनने निर्जुंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच एका बाकावर एक विद्यार्थी, विद्यार्थी, शिक्षकांचे टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर, सॅनिटायजर्स वापराची सोय, वर्गातील पटसंख्या लक्षात घेता एक दिवसाआड शाळा अशा संकल्पनादेखील राबविण्यात येणार आहेत. पालिका शाळेच्या आवारात असलेले कोविड लसीकरण सेंटरही अन्यत्र हलविण्यात येणार असून अशैक्षणिक कामांवर नेमण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझे काही फिरंगी मित्र,हॉलिवूड स्टार्स’ म्हणणारी राखी झाली ट्रोल
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
- ‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

