मुंबई : बॉलीवूडची ड्रामा क्विन राखी सावंत ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती ऍक्टिव्ह असून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतंच राखीने काही फोटो अपलोड केले आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे. यात ती फार ग्लॅमरस दिसत असली तरी टिकाकारांच्यानी तिच्यावर टिका करू लागले आहे.
राखी तिच्या काही फिरंगी मित्रासह आणि हॉलिवूड स्टार्ससोबत दिसत आहे. यात राखीने तिच्या मित्रांप्रमाणेच हटके लूक केला आहे. तिची स्टाईल आणि लूक अगदी तिच्या मित्रांप्रमाणेच पहायला मिळत आहे. राखी पोस्ट केलेले हे फोटो कोणत्या कार्यक्रमातील आहे, याची अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. मात्र यातील प्रत्येक फोटोत तिने हॉलिवूडप्रमाणे पोज देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘माझे काही फिरंगी मित्र आणि हॉलिवूड स्टार्स ‘ असे कॅप्शन राखीने या फोटोंना दिले आहे. मात्र तिच्या या फोटोवर भरपूर टिका होत आहे. यावेळी एका नेटकऱ्याने म्हटलं, तू त्यांच्यासमोर लहान बाळ वाटतेस. तर एकाने हीच आपली संस्कृती आहे का? असा प्रश्न थेट राखीला विचारला आहे. याआधीही राखीने काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो अपलोड केले होते. त्यावरही तिच्यावर बऱ्याच टिका ही झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
- ‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

