Share

अफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी शाळांचे दरवाजे बंदच; फक्त मुलांनाच मिळणार शिक्षण

Published On: 

अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानमधील माध्यमिक शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाला बंदी आणली आहे. शाळा सुरू झाल्यावर केवळ मुलं आणि पुरुष शिक्षकांनाच वर्गात परतण्याचे आदेश दिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. माध्यमिक वर्ग पुन्हा सुरू होतील असं जाहीर करण्यात असून इस्लामवादी गटाच्या निवेदनात मुली किंवा महिलांचा उल्लेख केला गेला नाही. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार एका अफगाण शाळकरी मुलीने यासंदर्भात प्रतिक्रिया देत ‘मी उद्ध्वस्त झाले आहे. सगळीकडे फक्त अंधार दिसत आहे’ असे म्हंटले आहे.

तसेच शुक्रवारी (१७ सप्टेंबर) तालिबान्यांनी महिला मंत्रालय देखील बंद केले आहे. फक्त एवढेच नाही तर त्याजागी एक कठोर धार्मिक शिकवण देणारा आणि कठोर धार्मिक तत्त्व सांगणारा विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आता महिलांसाठी शाळांचे दरवाजे बंद करण्याचा हा निर्णय घेतला गेला आहे. शनिवारी अफगाण शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि,’सर्व पुरुष शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपस्थित राहावं.’

दरम्यान, ‘माझी आई निरक्षर होती. म्हणून, माझ्या वडिलांनी तिचा सतत खूप छळ केला. मला माझी मुलगी माझ्या आईसारखी व्हायला नको होती. तर काबुलमधील दुसरी एक १६ वर्षीय शाळकरी मुलगी म्हणाली की, हा एक दुःखद दिवस ​​आहे. मला डॉक्टर व्हायचं होतं. पण माझं ते स्वप्न नाहीसं झालं. ते आम्हाला पुन्हा शाळेत जाऊ देतील, असं मला वाटत नाही. त्यांना महिलांना शिकू द्यायचे नाही.’ अशी प्रतिक्रिया एका शाळकरी मुलीने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!