🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया २००२ साली मिस इंडियाचा किताब आपल्या नावे केले. त्यानंतर अनेक चित्रपटातून चांगलीच लोकप्रिय झाली. आता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
नेहाने नुकतीच एका मुलाखत दिली तिने दुसऱ्यांदा प्रेग्नंट असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले आहे. प्रेग्नंट असताना नेहाला आणि तिच्या कुटुंबीयांना कोरोना देखील झाला असल्याचे तिने सांगितले. तसेच प्रेग्नंट असल्यामुळे तिला काही प्रोजक्ट्समधून काढण्यात आल्याचे नेहाने सांगितले आहे. प्रेग्नंट असतानाही नेहाने स्वत:ला कामात व्यस्त ठेवले आहे. तिने ‘ए थस्डे’चे चित्रीकरण सुरुच ठेवले होते. या चित्रपटात नेहाने प्रेग्नंट महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. मात्र या चित्रपटाच्या व्यतिरिक्त नेहाला प्रेग्नंट असल्यामुळे काही प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे तिने सांगितले. ‘गर्भवती असल्याची घोषणा केल्यानंतर मला काही प्रोजेक्टसमधून काढण्यात आले’ असे नेहा म्हणाली.
चाळीस वर्षांच्या नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर १८ नोव्हेंबर २०१८मध्ये नेहाने एका मुलीला जन्म दिला, तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता नेहा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
