Share

मस्ती की पाठशाला! औरंगाबादेत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

Published On: 

औरंगाबाद : ढोल ताशांचा गजर, तुतारींचा घुमणारा स्वर, चहुबाजूंनी पुष्पवृष्टी अन औक्षणाच्या ताटाचा थाट हे कुठल्याही लग्न समारंभातील दृश्य नव्हे तर मनपाच्या प्रियदर्शिनी विद्यालयात आज (दि.४) विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे जोरदार पद्धतीने स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरु करण्यास अनुमती दिलेली आहे. त्यानुसार मनपा हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून (दि.४) कोरोना नियमांचे पालन करुन सुरु करण्यात आले आहेत. यात प्रियदर्शनी विद्यालयात मस्ती की पाठशाला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरत आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मनपाच्या एकुण ४३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. यात ८ वी ते १० वीच्या १७ शाळा, तर ९ वी, १० वीच्या २६ शाळांचा समावेश आहे. मनपा शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचा धोका टळला आहे. ऑफलाइन शाळा सुरु झाल्यानंतर मुलांची उपस्थिती ऐच्छिक असेल. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येण्याची जबरदस्ती करू नये. दरम्यान, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती हीच पालकांची संमती समजून त्याला वर्गात बसवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आली होती. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, खासगी वाहन चालक, रिक्षाचालकांना दोन्ही डोस आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मध्यंतराची सुटी न देता वर्गातच अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. असेही या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. ३५०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार आहेत.

मस्ती की पाठशाला

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आजपासून शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत तर करण्यात आलेच. मात्र याशिवाय येणारे आठ दिवस प्रियदर्शिनीत ‘मस्ती की पाठशाला’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त गप्पागोष्टी आणि गाणे यांमधून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेची ओढ लावली जाणार आहे. कोरोनाच्या नकारात्मक वातावरणानंतर विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर प्रसन्न वाटावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!