मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा उद्या मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईत ताज महाल हॉटेल च्या बॉल रूम मध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने ‘समाज श्री’ या पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे.
ब्राह्मण एकता मंच चॅरिटी ट्रस्ट, परमार्थ ट्रस्ट, एकीकृत ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र या संस्थांच्या संयुक्त विद्यामाने रामदास आठवले यांचा उद्या दि. 5 ऑक्टोबर रोजी ताज महाल या पंचतारांकित हॉटेल मध्ये सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांचा ही ब्राह्मण भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
दलित बहुजन समाजाचे संघर्षनायक म्हणून रामदास आठवले यांनी समाजा साठी काम करतांना कोणताही जातीभेद न बाळगता सर्व जाती धर्मातील गरिबांसाठी काम करीत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करणारे लोकनेते म्हणून रामदास आठवले सर्व धर्मीयांत लोकप्रिय आहेत. मराठा आणि ब्राम्हण समाजाला सर्व सवर्ण समाजातील गरिबांना ही आरक्षण देण्याची रामदास आठवले यांनी नेहमी भूमिका घेतली आहे. ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. सर्व समाजाला जोडण्यासाठी दलित सवर्ण ब्राह्मण यांची एकजूट करण्यासाठी रामदास आठवले नेहमी प्रयत्नशील राहतात.त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या वतीने रामदास आठवले यांचा समाज श्री या पुरस्काराने गैरव करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- ‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

