Share

शाळा बंदच! बालभारतीकडून लाखो पुस्तके रद्दीत देण्यासाठी टेंडर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके धुळीत पडून आहेत. आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले आहेत. यादरम्यान ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी काढले जाणार आहेत. पेपर मिल्सने याबाबत टेंडर मागविले आहे. बालभारतीच्या एकूण नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून आहेत. पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल या भागात ही पुस्तके रद्दीत जमा झाली आहेत.

साधारण मार्च २०२० पासून कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. यादरम्यान शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली. मात्र ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आलीच नाहीत. त्यामुळे बालभारतीने हा निर्णय घेतला असल्याचे कळते आहे.

दरम्यान ठाकरे सरकारने १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा उघडणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. यामुळे बालभारतीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान तर झालेच शिवाय नवीन पुस्तके रद्दीत जमा झाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!