नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. मात्र एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
एसबीआय बँक १७ जूनला म्हणजेच गुरुवारी त्यांची खास सेवा बंद असणार आहे. त्यामुळे इंटरनेट बँकिंग, डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगचा दोन तास वापर करता येणार नाही. त्यांच्या ग्राहकांना पेमेंट करतांना कोणत्याही समस्या येऊ नये म्हणून एसबीआय बँकेकडून सिस्टिम अपग्रेडेशन सुरू आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience.#InternetBanking #YONOSBI #YONO #ImportantNotice pic.twitter.com/hxN9ptHQy5
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 15, 2021
स्टेट बँकने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन ग्राहकांना ही महत्वाची माहिती दिली आहे. उद्या दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत या बँकची इंटरनेट बँकिंगची सेवा बंद राहणार आहे. योनो अॅप, योनो लाइट, आणि यूपीआय लाइट यासारख्या सर्व सेवा बंद असणार आहे असे ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच बँकेच्या सर्व ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे न केल्यास पॅनकार्ड बंद होऊ शकते. असे सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद शहरातील लोक जाती-धर्मावर मतदान करतात, त्यांना विकास आवडत नाही’
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा


