बारामती: राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेते रोज हे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी करत असतात. रोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालूच असतात, मात्र दुसरीकडे भाजप आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक करतात. हे सगळं राजकारणातच बघायला मिळतं. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे.
बारामतीमध्ये खाजगी रुग्णालयाच्या योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे एकत्र आले होते. यावेळी बोलत असताना जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, अजितदादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. दादांची शिस्त मी पहिली आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांचे कौतुक केले.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, आम्ही राजकीय विरोधक जरी असलो तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी अजितदादांचा फॅन आहे आणि मला हे मला सांगायला काही वाटत नाही. आमचं राजकीय प्रत्येकांचं जमत नाही. पण, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टोकतीपणा मी पाहिला आहे, असं कौतुकच गोरे यांनी केलं. त्यानंतर बोलायला उभे राहिलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली.
महत्वाच्या बातम्या:
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
- औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

