Share

“सावरकरांनी सांगितलं होतं, एक दिवस येईल जेव्हा मतांसाठी काँग्रेस नेते कोटावर जानवं घालतील” : चित्रा वाघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षणांपैकी एक दिवस म्हणजे आजचा राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागल्यानंतर राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्याच्या सुरुवातीबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी राम मंदिर निर्माण ट्रस्टने पंतप्रधान कार्यालयाच्या तारखेनुसार ५ ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस ठरवण्यात आला. तर, कोरोना काळात होणाऱ्या भूमीपूजनावरून सुरुवातीला सत्ताधारी भाजपावर टीका करणाऱ्या काँग्रेसमधील काही नेते देखील आता या भूमीपूजनाचे स्वागत करताना दिसत आहेत.

काल, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी एका पत्रकाद्वारे राम मंदिराच्या भूमीपूजनाचे स्वागत करत ‘जय सियाराम’ चा नारा दिला होता. तर,  काँग्रेसचे नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणचं स्वागत करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी देखील ट्विटर द्वारे एक फोटो पोस्ट करत, राम मंदिर स्वागताचा संदेश व शुभेच्छा दिल्या आहेत.

राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल – रामदेव बाबा

यावरून, महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी ट्विट करत खोचक टीका केली असून, स्वा. सावरकरांच्या ओळी या ट्विट लिहिल्या आहेत. त्यांनी, ” सावरकरांनी बरोबर सांगितले होते, एक दिवस मतांसाठी काँग्रेस नेते कोटावर जानवं घालतील, जय श्रीराम’, अशी उपरोधिक टीका केली आहे.

जय श्रीराम : …अखेर वीज कंपनीने दिले ‘शट डाऊन’ न करण्याचे आश्वासन

दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.

मोठी बातमी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली कोरोना चाचणी! अहवाल आला…

तर, प्रियंका गांधी यांनी पत्रकात,  ‘अनेक युगांपासून भगवान श्रीरामाचे चरित्र भारतीय भूमीमध्ये मानवतेला जोडण्याचे काम करत आले आहे. भगवान राम आश्रय आहे आणि त्यागही. राम शबरीचाही आहे आणि सुग्रीवाचाही. राम वाल्मिकींचे आहेत आणि भासांचेसुद्धा आहेत. राम कबिरांचे आहेत आणि तुलसीदासांचेसुद्धा आहेत.’ असे भाव प्रकट केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!