अयोध्या : दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन, कायदेशीर लढाईनंतर आज अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणार आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या यादीनुसार अयोध्येत भूमिपूजनसाठी सुमारे पावणे दोनशे पाहुणे येणार आहेत. त्यातील काही विशेष आहेत तर काही सामान्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे राज्यपाल आनंदी बेन पटेल, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत मंचावर उपस्थित राहतील. योगगुरू बाबा रामदेवही अयोध्येत दाखल झाले असून हनुमानगढी येथे उपस्थित आहेत.
राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल’ असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला – अजित पवार
पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत 5 ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.
मोठी बातमी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली कोरोना चाचणी! अहवाल आला…


